धर्माबाद: एका उमेदवाराला बंद असलेला बोर सुरू करण्याचा उठाठेव पडला महागात, मतदाराने दाखवला चांगलाच इंगा, व्हीडिओ व्हायरल
धर्माबाद शहरामध्ये सध्याला नगर पालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी जोराने प्रचार व प्रसार सुरू असून यातच भाजपच्या उमेदवाराला प्रभागातील मागील 8 वर्षांपासून बंद असलेला बोर सुरू करण्याच्या शहाणपणा सुचला होता, बंद असलेला बोर सुरू करण्याच्या उठाठेव त्यास चांगलाच महागात पडला असून प्रभागातील एका मतदाराने त्यास चांगलाच इंगा दाखवत आताच बोर चालु करण्याचा शहाणपण सुचले काय? असे खडेबोल सुनावले होते याचा व्हीडिओ आजरोजी दुपारी 4 च्या सुमारास व्हायरल होत आहे.