धुळे महानगरपालिका निवडणुकीची अधिकृत घोषणा होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी या पार्श्वभूमीवर आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.निवडणुकीचे बिगुल वाजताच रावल यांनी भाजपच्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देताना, "आम्ही पूर्ण ताकदीने लढू आणि धुळे मनपावर एकहाती सत्ता स्थापन करू," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.