शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनच्या वतीने जिल्ह्यात 'कुरण लागवड' संकल्पना राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत नेर तालुक्यातील पाथ्रड गोळे येथे ई-क्लास जमिनीवर विकसित केलेल्या नेपियर चारा कुरणाच्या पहिल्या कापणीचा शुभारंभ मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.