अकोट: शेतकऱ्यांच्या वाढत्या प्रतिसादामुळे किसान ॲप शेतकरी मदत कक्ष कास्तकार सभागृह येथे हलवण्यात आला
Akot, Akola | Nov 27, 2025 सीसीआय कापूस खरेदीसाठी अत्यावश्यक असणाऱ्या किसान ॲपवरील शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर मदत व्हावी म्हणून बाजार समिती प्रशासना द्वारा शेतकरी मदत कक्ष स्थापना आला आहे तर या शेतकरी मदत कक्षास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.शेतकऱ्यांच्या मदतीसाठी असणाऱ्या पक्षाला मिळत असणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसाद व गर्दीमुळे हा कक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील कास्तकार सभागृह प्रांगणात हलवण्यात आला आहे. या ठिकाणी असणाऱ्या विस्तीर्ण जागेत हा कक्ष शेतकऱ्यांच्या सेवेत आहे.