अतिवृष्टी नापीकेला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 28, 2025
छत्रपती संभाजीनगर: राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं याच अतिवृष्टी, नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून ४७ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पैठण तालुक्यातील आडुळ येथे उघडकीस आली. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त करण्यात आले.