पाथर्डी: करंजी घाटात रस्ता खचला; वाहतुकीला धोका.
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष...
करंजी घाटात रस्ता खचला; वाहतुकीला धोका. कल्याण-विशाखापट्टण राष्ट्रीय महामार्गावरील अहिल्यानगर-पाथर्डी मार्गावर करंजी घाटात दर्गाखालील दुसऱ्या वळणाजवळ रस्त्याला मोठे भगदाड पडून एक बाजू खचली आहे. सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसानामुळे वाहतुकीला धोका निर्माण झाला असून त्या ठिकाणी एक बाजूचा रस्ता बंद करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने अद्याप दुरुस्तीची दखल घेतलेली नाही.