मुंबई: राज ठाकरेंनी आज शिवतीर्थ निवासस्थानी अकरा वाजता बैठक बोलावली
Mumbai, Mumbai City | Oct 6, 2025
आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक आज सकाळी अकरा वाजता शिवतीर्थावर मनसे नेते आणि सरचिटणीस यांच्या उपस्थितीत होत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेऊन संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.