पवनी: लहान मुलाच्या रडण्याने उघडकीस आली आईची आत्महत्या ; आसगाव येथील घटना
Pauni, Bhandara | Nov 24, 2025 तालुक्यातील आसगाव येथे एका विवाहितेने रागाच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. फिर्यादी गोपाल दत्ता ठाकरे (वय 33, रा. पिंझर ता. बार्शी/टाकळी, जि. अकोला. ह.मु. आसगाव) यांनी दिलेल्या तोंडी अहवालानुसार, पत्नी वैष्णवी गोपाल ठाकरे (वय 26) हिने घरगुती वादातून आत्महत्या केली. घटनेचा तपशील असा की, 22 नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे 11.30 वाजताच्या सुमारास पती-पत्नीमध्ये पगार वेळेवर न मिळणे आणि उत्पन्न कमी असल्याच्या कारणावरून किरकोळ वाद झाला.