कन्नड: तुटलेल्या विजेच्या तारेचा धक्का लागल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, गणेशपुर येथील घटना
कन्नड तालुक्यातील पिशोर परिसरातील गणेशपूर येथे तुटलेल्या विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने कुलदीपसिंग विजयसिंग सोळंके (वय ३३) या तरुण शेतकऱ्याचा जागेवरच मृत्यू झाला.गावातील वीजतार तुटलेली असून त्याबाबत अनेकदा तक्रार करूनही महावितरणने कोणतीही दखल घेतली नव्हती.त्याच निष्काळजीपणामुळेच या शेतकऱ्याचा जीव गेला, असा आरोप नातेवाइकांनी केला.घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.संतप्त ग्रामस्थांनी महावितरणच्या निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.