गोंदिया: रेल्वेगाडीतून उतरतांना महिला पडली, गोंदियाच्या रेल्वेस्थानकावर घटना
Gondiya, Gondia | Sep 23, 2025 नागपूर वरून गोंदिया येत असलेली महिला गोंदियाच्या रेल्वेस्थानकावर उतरतांना २२ सप्टेंबर रोजी पडल्याने ती गंभीर जखमी झाली. जिजा बाबुलाल उके (४०) रा. जूनी कामठी असे जखमी झालेल्या महिला प्रवाशीचे नाव आहे. तिला उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून या घटनेची नोंद गोंदिया शहर पोलिसांनी घेतली आहे.