उदगीर: ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर दोन गटात झोबांझोबीं,सहा जणावर गुन्हे दाखल
Udgir, Latur | May 13, 2025 उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे समोर सार्वजनिक ठिकाणी दोन्ही गटाकडून झोंबा झोंबी करण्यात आली. याप्रकरणी रविवारी ११ मे रात्री दहाच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ११ मे रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे समोरील मोकळ्या जागेतील सार्वजनिक रस्त्यावर आप आपसात झोंबा झोंबी करुन झुंज करीत असता मिळुन आले. याप्रकरणी ग्रामीणचे पोलीस कर्मचारी महेबूब आजम सयद यांच्या फिर्यादी वरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.