अमळनेर: गणपती नगरातील भीषण अपघातात दोघांच्या मृत्यूप्रकरणी आयशर ट्रक चालकाला अटक; अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल
अमळनेर शहरातील गणपती नगरातील पुष्पक बेकरी जवळ आयशर ट्रकने दिलेल्या धडकेत पती-पत्नी यांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यातील ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून शुक्रवारी २६ सप्टेंबर रोजी रात्री १२.३० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात आयशर ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.