अंबरनाथ: मतदान शांततेत पार पडावे यासाठी बदलापूर पोलिसांनी शेकडो पोलिसांच्या उपस्थितीत काढला रूट मार्च
आज पासून नगरपरिषद आणि नगरपंचायती निवडणुकीसाठीचे मतदान होत आहे. मतदान शांततेत पार पडावे कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी व नागरिकांनी कोणाच्याही दडपणाखाली येऊन मतदान करू नये बिनधास्तपणे नागरिकांना मतदान करिता यावे यासाठी बदलापूर पोलिसांनी रूट मार्च करून नागरिकांना मतदान करण्याचे आव्हान केले. यावेळी रूट मार्चमध्ये शेकडो पोलीस सहभागी झाले होते तसेच नागरिकांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य करू नये असे आव्हान देखील केले.