उमरेड: बेला परिसरात अवैध रेती वाहतुकीवर कारवाई; ६.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त
Umred, Nagpur | Jan 6, 2026 पिंपरा शिवारातील नांद नदीच्या पात्रातून अवैध रेतीची चोरी करणाऱ्यांविरुद्ध बेला पोलीस आणि महसूल विभागाने संयुक्त कारवाई केली आहे. ५ जानेवारी गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी एक ट्रॅक्टर , विना क्रमांकाची ट्रॉली आणि १ ब्रास रेती, असा एकूण ६,५५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी पोलिसांनी राजकुमार कामडी,सुधाकर खडगी,नरेश सोरते, मोहन मांडसकर या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला