नंदुरबार: नंदुरबार जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय विकासासाठी महत्त्वाचे पाऊल जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे आढावा बैठक संपन्न
दि. 29/09/2025 रोजी मा.जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड, नवी दिल्ली मार्फत राबवण्यात येणाऱ्या जिल्हा दुग्ध नियोजन आराखड्याच्या सर्वेक्षण कामाचा आढावा घेतला. या उपक्रमांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून 8 गावे निवडण्यात आली असून, एकूण 48 गावांमध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू आहे.