शिवीगाळ का करतोस, असे विचारल्यावरून तरुणाच्या डोक्यावर सळाखीने मारून जखमी करण्यात आले. ही घटना शहर पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम पिंडकेपार येथे बुधवारी (दि. ७) दुपारी १ वाजतादरम्यान घडली.पप्पू सयमलाल चक्रवर्ती (२८, रा. सेंद्रीटोला) हा आपल्या गाई चारण्यास गेला असता आरोपी रंजीत चमारू मडावी (३५, रा. पिंडकेपार) हा शिवीगाळ करीत असल्याने पप्पूने त्याला विनाकारण शिवीगाळ का करतोस, असे विचारले. यावर आरोपी रंजीतने जवळ ठेवलेल्या सलाखीने पप्पूच्या डोक्यावर व