कन्नड: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रशासनाचा ‘एक हात मदतीचा’ कन्नडमध्ये जिल्हाधिकारी स्वामींच्या हस्ते वाटप
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या ‘एक हात मदतीचा’ उपक्रमांतर्गत कन्नड तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यात आला.जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते फराळ किट, किराणा साहित्य आणि रब्बी हंगामासाठी बियाणे किट वाटप करण्यात आले.या वेळी जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, “खचून न जाता प्रशासन आणि समाज तुमच्या सोबत आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.