शिंदखेडा: चिरणे शिवारात रेल्वे खाली पडून एका अनोळखी 45 वर्षे व्यक्तीचा मृत्यू शिंदखेडा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद.
शिंदखेडा तालुक्यातील चिरणे शिवारात रेल्वे खाली एका 45 वर्षे व्यक्तीचा मृत्यू. शिंदखेडा कडून नरडाणाकडे जात असलेल्या रेल्वेतून एका 45 वर्षे व्यक्तीचा तोल गेल्याने तो रेल्वेच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाला. सदर बाब स्टेशन मास्तर पूजा तोडके यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने सदर अनोळखी व्यक्तीस उपचारार्थ शिंदखेडा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले यावरून शिंदखेडा पोलिसात आकस्मात मृत्यूचे नोंद करण्यात आली.