वाशिम: पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते 04 ऑक्टोबर रोजी 95 उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरण सोहळा
Washim, Washim | Oct 2, 2025 मुख्यमंत्री महोदयांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत सर्वसमावेशक सुधारित अनुकंपा नियुक्ती धोरणानुसार वाशिम जिल्ह्यातील 95 उमेदवारांना दि. 4 ऑक्टोबर जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात येणार असून यामध्ये अनुकंपा धोरणांतर्गत 49 उमेदवार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस प्राप्त 46 उमेदवार यांचा समावेश असल्याची माहिती दि. 02 ऑक्टोबर रोजी देण्यात आली आहे.