सातारा: दलित अत्याचाराविरोधात साताऱ्यात जन आक्रोश मोर्चा; सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठाविरोधात लढाई,आरपीआय जिल्हाध्यक्ष गणेश भिसे
दलितांवर वाढत चाललेल्या अत्याचारांविरोधात इथून पुढची लढाई ही सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांच्याविरोधात असेल, असा ठाम इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) सातारा जिल्हाध्यक्ष गणेश भिसे यांनी दिला. दलित अत्याचारांच्या घटनांवर शासनाला जाब विचारण्यासाठी आज साताऱ्यात जन आक्रोश महामोर्चा काढण्यात आला.आरपीआय सातारा जिल्हातर्फे आयोजित या महामोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून झाली. मोर्चा राजवाडा, पोवई नाका मार्गे जात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.