प्रतापनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक संतापजनक घटना समोर आली आहे. घरात भाडेकरू म्हणून राहायला आलेल्या एका २१ वर्षीय जिम ट्रेनरने १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.भुवन उर्फ अभी योगराज भैरम असे आरोपीचे नाव असून तो मूळचा पारडी येथील रहिवासी आहे. तो प्रतापनगर भागातील एका जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करतो.