शिरपूर: शिरपूर-वरवाडे नगरपरिषद निवडणूक : मतदान यंत्र सीलिंग प्रक्रिया पूर्ण निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांची माहिती
Shirpur, Dhule | Nov 29, 2025 शिरपूर-वरवाडे नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदानाची पूर्वतयारी वेगात सुरू असून २ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या मतदानासाठी आवश्यक असलेली मतदान यंत्र सीलिंगची महत्त्वपूर्ण प्रक्रिया २९ नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजेपासून टाउन हॉल येथे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आली.नगराध्यक्ष पदासह एकूण ३२ प्रभागांसाठी मतदान होणार असून प्रत्येक प्रभागानुसार मतदान यंत्रांचे सीलिंग करण्यात आले. सीलिंगनंतर संबंधित उमेदवार प्रतिनिधींच्या समक्ष मतदान यंत्रांची चाचणी घेण्यात आली.