साकोली: सभापतींनी अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याच्या निषेध करत साकोली पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आमदारांना निवेदन
साकोली पंचायत समितीचे सभापती डॉ.ललित हेमने यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा निषेध म्हणून साकोली पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सोमवार दिनांक 22 सप्टेंबरला दुपारी तीन वाजता साकोली येथील जनसंपर्क कार्यालयात आमदार नानाभाऊ पटोले तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांना निवेदन दिले आहे जोपर्यंत सभापती जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन ठेवण्याचा इशारा देखील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी दिला आहे