कारंजा: तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत करा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा तहसील वर मोर्चा
Karanja, Washim | Sep 22, 2025 तालुक्यात सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे कारंजा तालुक्यातील खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तसेच शेतकऱ्यांनी कष्टाने उभ्या केलेल्या सोयाबीन, उडीद, कपाशी यांसह इतर पिके आडवी-तिडवी पडून मोठ्या प्रमाणावर नष्ट झाली आहेत.परिणामी अपेक्षित उत्पादनाचे स्वप्न उध्वस्त झाल्याने शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले असून, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी संपूर्ण तालुक्यात दिवसेंदिवस तीव्र होत आहे. पावसाचा कहर आणि शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती लक्षात घेता शासनाने तातडीने मदतीची पावले उचलावीत,