बुलढाणा: तू प्रदेश अध्यक्ष आहे तर अगोदर तुझ्या आमदार,खासदारांचे स्टिकर काढ,आ.संजय गायकवाड यांचे हर्षवर्धन सपकाळ यांना प्रतिउत्तर
आ.संजय गायकवाड यांच्याकडे डिफेंडर कार आल्यानंतर हा मुद्दा गाजत असून त्यांच्यावर अनेक आरोप होत आहे. यालाच प्रत्युत्तर देत आ.गायकवाड म्हणाले की,हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की आमदारांच्या गाडीवर लावलेले स्टिकर हे तमाशा आहे,स्टिकर लावता येत नाही,तू प्रदेश अध्यक्ष आहे तर अगोदर तुझ्या आमदार, खासदारांचे स्टिकर काढ आणि 5 वर्ष तू आमदार असताना स्टिकर लावून मिरवला,त्याचा उत्तर दे,असे प्रत्युत्तर आज 24 ऑक्टोबर रोजी दुपारी आ.संजय गायकवाड यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना दिले आहे.