निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगरूळपीर तालुक्यात कुठलीही अनुचित घटना घडू नये किंवा आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून शहरातून पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिनांक 9 नोव्हेंबर रोजी दिली आहे. या रूट मार्च मध्ये सर्वप्रथम मंगरूळपीर पोलीस स्टेशन आवारामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात दंगा काबू तालीम घेण्यात आली.