अमळनेर शहरातील गजानन नगरात राहणाऱ्या एका प्रौढाने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी १७ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास समोर आली आहे. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गणेश वसंत जाधव वय ४३ रा. गजानन नगर, अमळनेर असे मयत झालेल्या प्रौढाचे नाव आहे.