शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र मोरे आणि राजू कसबे यांच्या नेतृत्वात औसा पोलीस ठाण्यात भारताची लोकशाही चोरी गेल्याची तक्रार मंगळवारी सायंकाळी दाखल करण्यात आली आहे. सदर तक्रारीची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी या तक्रारीतून करण्यात आली आहे. यावेळी शेतकरी नेते राजेंद्र मोरे आणि राजू कसबे यांच्यासह कारकर्ते उपस्थित होते.