सिलेगाव तालुका गोरेगाव येथे देवी राधिका प्रियंवदा जी विंध्याचल धाम (अयोध्या) यांच्या पावन सान्निध्यात आयोजित श्रीमद् भागवत कथा कार्यक्रमात आमदार विजय रहांगडाले यांनी उपस्थिती दर्शविली. या दिव्य कथामृतातून भक्ती, संस्कार व जीवनमूल्यांची सुंदर अनुभूती मिळाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक व सर्व भाविकांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार. असे याप्रसंगी आमदार विजय रहांगडाले म्हणाले.