हिंगणघाट: दिंदोडा प्रकल्पग्रस्तांचा शहरातील रस्त्यावर आक्रोश मोर्चा:आमदार कुणावार यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चचे आश्वासन
हिंगणघाट:दिंदोडा प्रकल्पग्रस्तांनी आपले हक्क मिळवण्यासाठी शहरात भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. २४० कोटी रुपयांची भरपाई प्रकल्पग्रस्तांना देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त महिला, पुरुष व युवा नागरिक रस्त्यावर उतरले होते. त्यांचे मागणीकडे दीर्घकाळापासून दुर्लक्ष होत असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये संताप उसळला होता शहराच्या प्रमुख चौकामधून मोर्चा निघत असताना नागरिक हजारोच्या संख्येने प्रकल्पग्रस्त यात सहभागी झाले होते.