धरणगाव: खोटे नगर येथे चाकूच्या धाक दाखवून रिक्षा प्रवाशाला लुटणाऱ्या तिघांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
रिक्षामधून जात असताना एका तरुण प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून १८ हजार रुपये लांबविण्यात आले. ही घटना १४ सप्टेंबर रोजी खोटेनगर थांब्यानजीक घडली होती. याप्रकरणी शुक्रवारी १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात तीन संशयित आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.