राहुरी: सडे येथे टेम्पोने स्कार्पियोला धडक दिल्याने मारहाण राहुरी पोलीसात गुन्हा दाखल
रात्रीच्या वेळी उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला स्कॉर्पिओ गाडीने धडक दिली. स्कॉर्पिओ गाडीची नुकसान भरपाई दे, असे म्हणून अतुल तनपूरे यांना लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील सडे येथे घडली असून याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये तीन इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.