खुलताबाद: खुलताबाद तालुक्यात निवडणूक रणधुमाळी; उमेदवारी अर्जांसाठी शेवटचा एक दिवस, प्रशासन सज्ज, मंगळवारी १३ अर्ज दाखल
खुलताबाद तालुक्यातील जिल्हा परिषदचे तीन गट व पंचायत समितीच्या सहा गणांसाठी येत्या ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुचिता शिंदे व तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी संतोष गुट्टे यांनी दिली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २१ जानेवारी असून उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ एक दिवसाचा कालावधी शिल्लक आहे.