आज दिनांक 16 जानेवारी 2026 वार शुक्रवार रोजी रात्री 9 वाजता भोकरदन शहरातील नवे भोकरदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येत जल्लोष साजरा केला या जल्लोषाचे कारण म्हणजे आज राज्यात महापालिका निवडणुकीचा निकाल हाती आला असून या 26 वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक निवडून आले आहे त्याबद्दल आनंदी होत या कार्यकर्त्यांनी हा जल्लोष साजरा केला आहे.