नरखेड: नरखेड पोलीस ठाण्याचे 46 कुख्यात आरोपींची घेण्यात आली परेड
सात ऑक्टोंबर ला रात्री सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनात आज नरखेड पोलीस स्टेशन येथे 46 कुख्यात आरोपींची परेड घेण्यात आली. आगामी सण उत्सव शांततेत साजरे व्हावे यासाठी नागपूर ग्रामीण पोलिसांकडून कुख्यात आरोपींची परेड घेण्याचा अभिनव उपक्रम मागील काही दिवसांपासून राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आज नरखेड पोलीस ठाण्यात आरोपींची परेड घेण्यात आली