चामोर्शी: जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय चामोर्शी येथे लायडस मेटल खनिकर्म योजनेअंतर्गत सायकलचे वितरण
जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय चामोर्शी येथे लायडस मेटल खणीकर्म योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दग.६ आक्टोबंर सोमवार रोजी दूपारी ३ वाजता मोफत सायकल वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमामुळे ग्रामीण व दुरवरून येणाऱ्या मुलींना शिक्षणासाठी होणारा प्रवासाचा त्रास सुलभ व सुरक्षित होणार आहे.