तालुक्यातील शिवणी येथील महाविहार धम्मभूमी येथे, आश्विन पौर्णिमा आणि वर्षावास समारोप
बीड तालुक्यातील शिवणी येथील महाविहार धम्मभूमी, डॉ. आनंद कौसल्यायन नगर येथे, आश्विन पौर्णिमा आणि वर्षावास समारोपानिमित्त, मंगळवार दि. ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता भव्य धम्मउत्सव, धम्मदेसना, भोजनदान आणि सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात भिक्खु धम्मशील थेरो यांची धम्मदेसना झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाबुराव पोटभरे, अनिल डोंगरे, प्रा. डॉ. विक्रम धन्वे, राजेश शिंदे उपस्थित होते.संपादक नितीन मूजमुले यांनी बौद्ध धम्म स्वीकारल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्या