खेड: सराईत सोनसाखळी चोराच्या पोलिसांनी चाकण येथे आवळल्या मुसक्या
Khed, Pune | Sep 14, 2025 पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता विरोधी गुन्हे पथकाने रेकॉर्डवरील सराईत सोनसाखळी चोराला सापळा लावून अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून चार सोन्याची मंगळसूत्रे, एक दुचाकी वाहन असा तब्बल ₹6,53,153 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईतून सोनसाखळी चोरीचे 4, घरफोडीचे 4 आणि दुचाकी चोरीचा 1 असे एकूण 9 गुन्हे उघडकीस आले आहेत.