अंजनगाव सुर्जी येथील सुप्रसिद्ध छायाचित्रकार, शब्दसृष्टी साप्ताहिक वृत्तपत्राचे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार नागेश गोळे यांच्या वाहनाचा काल रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास चिखलदरा टी-पॉईंट परिसरात अपघात झाला.या अपघातात नागेश गोळे हे गंभीर जखमी झाले.त्यांना उपचारासाठी अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.नागेश गोळे हे त्यांच्या मारुती अल्टो क्रमांक एम एच २७ एसी ३१६४ या वाहनाने अंजनगाव सुर्जीकडे येत असताना चिखलदरा स्टॉप जवळ त्यांच्या वाहनाचा अपघात झाला