उदगीर: उदयगिरी महाविद्यालया जवळ दुचाकीच्या धडकेत दोघे जखमी,एकावर गुन्हा दाखल
Udgir, Latur | Oct 27, 2025 उदगीर शहरातील उदयगिरी महाविद्यालया जवळ दुचाकीच्या धडकेत दोघे जखमी झाल्याची घटना २५ ऑक्टोबर रोजी रात्री घडली आहे याप्रकरणी २६ ऑक्टोबर रोजी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, एम एच २४ ए ९१७९ या क्रमांकाच्या दुचाकी वरून सोमनाथपूर कडे जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकी स्वाराने दुचाकी भरधाव वेगाने चालवून दुचाकीला जोराची धडक दिली यात दोघे जखमी झाले ओमप्रकाश बळीराम दाजी यांच्या फिर्यादी वरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे