शहरात निवडणुकीचे वारे वाहत असतानाच एका खळबळजनक हत्याकांडाने नागपूर हादरले आहे. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लुंबिनी नगर भागात जुन्या वादातून एका व्यक्तीची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मृत मंगेश भीमरावजी भिमटे हे आरोपी कुणाल उर्फ गोलू विद्याधर कांबळे याच्या शेजारी राहत होते. एका घराच्या विक्रीच्या व्यवहारावरून आरोपीचा त्याच्या भावाशी वाद सुरू होता, ज्यामध्ये मृत मंगेश भिमटे हे मदत करत होते.