सह्याद्री बार समोरील रोडवर मुगट तालुका मुदखेड जिल्हा नांदेड येथे दि 7 डिसेंबर 2025 रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास यातील आरोपी सोपान कल्याणे, संदिप कल्याणे यांनी यातील फिर्यादीस मोटार सायकल बंद पडल्याचे कारणावरून शिवीगाळ करून दगडाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादी बालाजी ढगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुदखेड पोलीस ठाण्यात आज सायंकाळी गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कदम आज करीत आहेत.