सेलू शहराच्या विकास चौक परिसरात नाकाबंदी दरम्यान संशयास्पद हालचाल करणाऱ्या चार इसमांना सेलू पोलिसांनी ता. ८ जानेवारी गुरुवारी मध्यरात्री ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आणि तीन मोबाईल संच असा एकूण ५ लाख २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती सेलू पोलिसांकडून देण्यात आली.