दारव्हा: गौळपेंड येथील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाला पोलीस दलाकडून आदर्श मंडळ पुरस्कार
यवतमाळ जिल्हा पोलीस दलातर्फे ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत आयोजित आदर्श दुर्गा उत्सव मंडळ स्पर्धेत दारव्हा तालुक्यातील गौळपेंड येथील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाची आदर्श मंडळ म्हणून निवड झाली आहे. या यशाबद्दल मंडळाला आज दि. १६ ऑक्टोंबर ला दुपारी बारा वाजता दरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालय यवतमाळ येथे प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.