त्र्यंबकेश्वर: अचानक आलेल्या पावसाने श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे दाणादाण मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने भाविकांची तारांबळ
दोन दिवसापासून काहीशी उघडीप दिल्यानंतर बुधवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या पावसाने एकच धावपळ झाली. मंदीर परिसरात रस्त्यावरून पूराचे पाणी वाहू लागल्याने आलेल्या भाविकांना पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागली.