फलटण येथील डॉ.संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणाचा राज्यभरात निषेध नोंदवत, सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज रात्री छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकात वैद्यकीय सेवा देणाऱ्या सर्व संघटनांकडून मशाल मोर्चा काढण्यात आला. या मशाल मोर्चात इंडियन मेडिकल असोसिएशन, मार्ड, राज्य मेडिकल असोसिएशन आणि नर्सिंग संघटने होते