सांगोला: धनगर समाजाचा लढा निर्णायक टप्प्यात, राज्य सरकारकडे सर्वांचे लक्ष-जालना येथे आमदार बाबासाहेब देशमुख यांचा संवाद
धनगर आरक्षणासाठी जालना येथे दीपक बोऱ्हाडे यांचे आमरण उपोषण नवव्या दिवशी पोहोचले असून त्यांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाला आहे. रक्तदाब व हृदय गती वाढल्यामुळे आणि शरीरातील पाण्याची कमतरता आढळल्याने चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर २६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी उपोषणस्थळी भेट देऊन बोऱ्हाडे यांना पाठिंबा दर्शवला. ते म्हणाले की धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळवून देण्यासाठी ते विधानसभेत ठामपणे प्रयत्न करतील.