लाखनी: सामेवाडा येथे जखमी चितळाला दिले जिवनदान
१९ सप्टेंबर दुपारी ३ वाजता लाखनी वनक्षेत्र सहन क्षेत्र जांभळी अंतर्गत बीट मुंडीपार, मौजा सामेवाडा येथील गट क्रमांक २३२ मध्ये दिपक रणभिळ बोळणे यांच्या शेतामध्ये जखमी अवस्थेत वन्यप्राणी चितळ आढळून आला. या घटनेची माहिती लाखनी वनविभागाला देण्यात आली. वनविभागाने तात्काळ घटनास्थळी पोहोचत चितळास चालता येत नसल्यामुळे वनविभागाच्या पथकाने तात्काळ रेस्क्यू करून त्याला लाखनी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.