गोंदिया: जयस्तंभ चौकातील प्रशासकीय इमारतीसमोर ओबीसी एसटी आरक्षणाच्या समर्थनार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन
Gondiya, Gondia | Sep 19, 2025 जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ओबीसी व एसटी आरक्षणाच्या समर्थनार्थ धरणे आंदोलन दि.19 सप्टेंबर रोजी शुक्रवारला सकाळी 11:30 ते दुपारी 3 वाजेच्या दरम्यान जयस्तंभ चौकातील प्रशासकीय इमारती समोर करण्यात आले. खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड, जि प सदस्य जितेंद्र कटरे, शसेन्द्र भगत, डेमेद्र रंहागडाले, राधेलाल पटले, झामसिंगभाऊ बघेले, आदी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.