भुसावळ शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी संजीवनी ठरणारी 'अमृत योजना' सध्या राजकीय वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या योजनेचे काम रखडल्याने भुसावळच्या जनतेला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री संजय सावकारे यांनी मंगळवारी 6 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता अत्यंत गंभीर प्रतिक्रिया दिली असून, केवळ एका फोनवर हे काम थांबवण्यात आल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.